ए वन बिटा कॅसिन – दुधातला राक्षस? आपल्या सुरक्षिततेसाठी कसा दूर करायचा हा राक्षस ते पाहूया.
“अरे काय रे तुमची आजकालची नवीन फॅड? आत्तापर्यंत फळं, भाज्या ऑर्गॅनिक ऐकलं होतं, आता दुधाला तुम्ही ऑर्गॅनिक, खराब, चांगलं असं करणार होय? आमच्यावेळी असं नव्हतं बुवा, सगळंच कसं शुद्ध आणि दर्जेदार.”
“अहो आजोबा, तीच तर मेख आहे ना. तुमच्या वेळचं सगळंच कसं शुद्ध आणि दर्जेदार असायचंच. आता मात्र ती शुद्धता मिळवण्यासाठी आम्हाला ऑर्गॅनिक या शब्दाचा आधार घ्यावा लागतो. आणि आता ऑर्गॅनिक दूध नक्की कोणतं, तर ते म्हणजे ए टू दूध, ज्यात ‘ए वन बिटा कॅसिन’ या नावाचा प्रोटीनचा राक्षस नसतो.”
आमच्या घरी नेहमीचं दूध बदलून ए टू दूध घ्यायची सुरवात करताना ते नक्की का बदलतोय हे आजोबांना समजावण्याची सुरवात अशी काहीशी झाली. तुमच्या घरचं साधं दूध बदललं की नाही? दुधातला राक्षस दूर केला की नाही अजून? चला तर मग समजून घेऊया असं करणं नक्की का गरजेचं आहे ते.
वास्तविक पाहता सगळ्यात पौष्टिक गोष्ट कोणती तर ते म्हणजे दूध असंच आपल्या मनावर लहानपणापासून बिंबवलं गेलं आहे. आणि यात खरं म्हणजे काही चुकीचंही नाही. पण दुधातली ही पौष्टिकता सगळ्या प्रकारच्या दुधांमध्ये खरंच असते की नसते हे आपण तपासून पहायची वेळ मात्र नक्की आलेली आहे. घरातल्या लहान मुलांनी रोज ग्लासभर दूध घेतलं की आपलं काम संपलं असं नसून ते दूध कोणत्या प्रतीचं आहे हे बघणं ही आज काळाची गरज आहे.
आपल्या आजी-आजोबांच्या काळातलं भारतीय गाईचं दूध हे नक्कीच शंभर टक्के पौष्टिक होतं. मात्र काळानुसार आणि वाढणाऱ्या उत्पादनासाठी म्हणून गाईंमध्ये जे हॉर्मोनल म्हणजेच जनुकीय बदल करण्यात आले त्यामुळे दुधातले प्रोटिन्स काही प्रमाणात बदलले. आता या बदललेल्या प्रोटीन्सचं जेव्हा संशोधन करण्यात आलं तेव्हा या संशोधनातून असं निष्पन्न झालं की मूळ भारतीय गाईंमध्ये जे पौष्टिक
प्रोटिन्स होते ते बदलले गेल्या कारणाने आता काही प्रकारचे दूध हे मानवासाठी घातक आणि हानिकारक ठरत आहेत.
भारतीय गाईच्या दुधामध्ये आढळणाऱ्या मूळ प्रोटीनचे नाव ‘ए टू बिटा कॅसिन’ असे असून बदललेल्या आणि घातक ठरत असलेल्या प्रोटीनचे नाव ‘ए वन बिटा कॅसिन’ असे आहे. दुधामध्ये आढळणाऱ्या या दोन प्रोटिन्स वरुन दुधाचे देखील आता मुख्यत्वे दोन प्रकार मानण्यात येतात, ए वन दूध आणि ए टू दूध. गीर गाय किंवा मूळ भारतीय वंशाच्या देसी गाई मुख्यत्वे ए टू दूध देतात, मात्र विदेशी गाई किंवा संकरित गाई, जसे जर्सी गाय मुख्यत्वे ए वन दूध देतात. परंतु जर्सी गाई जास्त दूध देत असल्याकारणाने बिझनेसच्या दृष्टीकोनातून याच गाईंचे आणि याच दुधाचे उत्पादन मोठ्या प्रमाणावर होताना आपण भारतात बघतो.
ए टू दुधामध्ये रोग प्रतिकारक शक्ती वाढवण्यासाठी लागणारे घटक, प्रोटीन म्हणजेच प्रथिने, खनिजे आणि जीवनसत्व भरपूर प्रमाणात आढळतात आणि म्हणूनच हे दूध आरोग्यासाठी अत्यंत लाभदायक मानले जाते. याउलट ए वन दुधामध्ये मात्र बॅड कोलेस्ट्रॉल वाढवणारे आणि शरीराला हानिकारक अशी काही घटके आढळून आल्याने या दुधापासून लांबच राहण्याची गरज निर्माण झाली आहे. गेल्या काही काळात दुधामधल्या या फरकाबद्दल मोठ्या प्रमाणावर जनजागृती झालेली आहे. परंतु अजूनही अनेक लोक या गोष्टीकडे फॉरेनचं फॅड असे म्हणून दुर्लक्ष करतात. आणि म्हणूनच दुधातला हा राक्षस दूर करून पुन्हा एकदा शुद्ध आणि सात्विक दूध घेऊन येत आहोत गोसत्व, जे पूर्णतः देशी गाईचे दूध आहे. या दुधाबरोबरच आम्ही दुधापासून तयार होणारी अनेक पदार्थ तुमच्यासाठी घेऊन येत आहोत,
तेव्हा नक्की बघा आणि वाचा आमचे पुढील ब्लॉग्ज…